व्यायामाचा कंटाळा, एकाच जागी जास्त वेळ बसणे यांसारख्या कारणांमुळे पाठदुखी होते. वर्क फ्रॉम होम संकल्पना सुरु झाल्यानंतर पाठदुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाठदुखीमुळे तुमची कार्यक्षमता तर कमी होतेच शिवाय शारीरिक हालचालींवरही मर्यादा येतात. सामान्य वाटणाऱ्या पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी ठरू शकते. काही घरगुती उपायांनी पाठदुखीची समस्या कमी करता येऊ शकते
मिठाच्या पाण्याने अंघोळ करा
अंघोळीच्या कोमट पाण्यात खडे मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करा. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू मोकळे होऊन पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
योगासने करा
त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन, पवनमुक्तासन ही आसने पाठदुखी रोखण्यासाठी प्रभावी आहेत. या आसनांच्या नियमित सरावाने पाठदुखी कमी होते.
तेलाने मालिश करा
रात्री जवसाच्या तेलाने पाठीला मालिश केल्याने पाठदुखीचा त्रास कमी होतो.
तसेच मोहरी किंवा खोबरेल तेलामध्ये ४-५ लसूण पाकळ्या उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर पाठीला मसाज करा.
आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ खा
हाडं ठिसूळ होणं हे पाठदुखीचं प्रमुख कारण मानलं जातं. हाडे मजबूत होण्यासाठी आहारात साजूक तूप, दूध, उडीद, मासे अशा कॅल्शियमयुक्त पदार्थाचा समावेश करावा.