जागरण, खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता यांसारखी पित्त होण्याची अनेक कारणे असू शकतात. पित्ताचा त्रास होत असेल तर खालील घरगुती उपाय करून पहा
गूळ
जेवल्यानंतर थोडासा गूळ खा.
कोमट पाणी
सकाळी 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने पित्त कमी होते.
लवंग
जेवल्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्त कमी होते.
तुळशीची पाने
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धूवून कोमट पाण्यात टाकून प्यावी, पित्त कमी होते.
कोरा चहा
कोऱ्या चहात लिंबू पिळून पिल्याने पित्त कमी होते.
बडीशेप
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्याने पित्त कमी होते.
मनुका
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
टीप : घरगुती उपायांनी पित्त कमी होत नसेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.