छातीत जळजळ झाली की त्रास तर होतोच शिवाय अस्वस्थपणाही वाढतो. अतितेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ खाणे, पुरेशी झोप न घेणे, रात्री खूप उशिरा झोपणे, रात्री उशिरा आणि भरपेट जेवण करणे, रात्री भरपेट जेवून तात्काळ झोपणे, मद्यपान करणे, गोळ्या औषधे खाणे, अतिकडक उपवास करणे, पचनास जड असलेले उपवासाचे पदार्थ खाणे, खूप वेळ उपाशी राहणे, शिळे अन्न यांसारख्या अनेक कारणांनी अ‍ॅसिडिटी वाढून छातीत जळजळ होते.
काही घरगुती उपाय करून या समस्येपासून अराम मिळवता येतो.

गूळ
जेवणानंतर थोडा गूळ खाऊन एक ग्लास पाणी प्या. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचन क्रियेला गती मिळते तसेच पोटात अ‍ॅसिड तयार होण्यास प्रतिबंध होतो.

आलं
जेवण केल्यानंतर छातीत जळजळ होत असलं तर जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या.

थंडगार दूध
थंडगार दूध पिल्यानेही अ‍ॅसिडिटीपासून तात्पुरती मुक्ती मिळते.

आवळा
अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी आवळा सुपारी, आवळा कॅंडी किंवा आवळ्याची एखादी फोड खा. आवळ्याचा ज्यूसनेही छातीतील जळजळ कि होते. मात्र हा ज्यूस नैसर्गिक असावा कोणतेही घटक त्यात मिसळलेले नसावेत.

ओव्याचे पाणी आणि काळे मीठ
ओव्याच्या पाण्यात काळे मीठ टाकून जळजळ कमी होते.
कसे बनवावे ओव्याचे पाणी
एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळा. पाणी थोडे उकळवून अटवून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात काळे मीठ टाकून प्या.

तुळशीची पाने
सकाळी उठून तुळशीची काही पाने चावा.

लिंबूपाणी आणि काळे मीठ
लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या.

कोरफड रस
जेवणाच्या अर्धा तास आधी २-३ चमचे कोरफडीचा रस प्या.

जिऱ्याचे पाणी
एक चमचा जिरा एक कप पाण्यात उकळा. पाणी थोडे उकळवून अटवून घ्या. थंड झाल्यानंतर हे जिऱ्याचे पाणी प्या.

बडीशेप
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानेही छातीतील जळजळ थोड्या प्रमाणात कमी होते.