एक बादली पाण्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब एकत्र करून त्यामध्ये कपडे १५-२० मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.

कपड्यांवर जिथे रंग लागला असेल, तो भाग ओलसर करून घेऊन त्यावर टूथपेस्ट लावा. ही पेस्ट सुकल्यानांतर नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाका.

कॉर्न फ्लोअर दुधामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करून कपड्यांवर जिथे रंग लागला असेल त्याठिकाणी लावा. ही पेस्ट सुकल्यानांतर नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाका.

पांढऱ्या कपड्यांना नेहमी रंगीत कपड्यांसोबत कधीच धुवू नये.

पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून त्यात धुतलेले पांढरे कपडे १ तास भिजत ठेवा. यामुळे कपड्यांचा पिवळसरपणा जातो.

घामाचे पिवळसर डाग कपड्यांवर पडले असतील तर लिंबाचा रस या डागांवर १०-१५ मिनिटे लावून ठेवा नंतर नेहमीच्या साबणाने कपडे धुवून टाका.

उन्हाचा त्रास होत आहे मग बेलफळाचे सरबत प्या; जाणून घ्या इतर फायदे

कडक उन्हात ‘त्वचे’च्या समस्येपासून राहा असे दूर; करा हे उपाय