आजकाल अनेक लोकांना विविध शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचं कारण म्हणजे व्यायाम न करणे आणि चांगला आहार न घेणे. सध्याच्या काळात हायब्लडप्रेशरचे रूग्ण वाढत आहेत. या आजाराची अशी काही लक्षणे दिसत नाहीत परंतु जेव्हा तो झाला आहे असं समजतो तेव्हा धक्काच बसतो.
चला तर मग जाणून घेऊ या आजाराविषयी संपूर्ण माहिती-
– ब्लड प्रेशर किती असावा
आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर सतत बदलत असतो. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाही तो बदलत असतो आणि जेव्हा तुम्ही निवांत बसलेला असता तेव्हाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 mm/Hg च्या वर वाढतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणजेच हायब्लडप्रेशर म्हणतात.
– उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती?
-टाचांना सूज येणे
– सारखी लघवीला लागणे
– इरेक्टाईल डिसफंक्शन
– उच्च रक्तदाब असेल तर काय करावे?
– सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकस, संतुलित आहार घ्या आणि मीठाचे सेवन कमी करा. धूम्रपान करत असेल तर ते लगेच थांबवा. शिवाय घरी नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा आणि नियमित तपासणी करा.
– विशेष म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचे सेवन करा.
– जर तुमचं पोट खूप वाढलं असेल तर व्यायाम करा. दिवसभर शरीराची हालचाल होत राहिल याकडेही लक्ष द्या.