ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, काजू खायला सर्वांना आवडतं. ते खाल्ल्याने शरीराला खूप फायदेही होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का अक्रोड खाण्याचेही खूप फायदे आहेत. दररोज 2-3 अक्रोड खाणे आवश्यक आहे. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते खा.

अक्रोड खाण्याचे फायदे

– रोज अक्रोड खाल्ले तर मेंदू तीक्ष्ण होतो. तसेच मेंदूची शक्ती वाढते.

– अक्रोड खाल्ल्याने ताण तणाव दूर होतो. तसेच झोप चांगली लागते.

– अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

– ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे त्या लोकांनी दररोज अक्रोड खाल्ले पाहिजे. अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

– अक्रोड खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते.

– अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळे त्वचा सुंदर बनते.

– रोज अक्रोड खाल्ले तर डोळ्यांखाली जी काळी वर्तुळे बनलेली असतात ती कमी होतात.

– अक्रोड खाल्ल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास होतो त्यांनी अक्रोड खावीत.