हळद खाण्याचे फायदे सर्वानांच माहित असतील मात्र कच्च्या हळदीच्या सेवनाविषयी आणि फायद्यांविषयी बहुतांश जणांना माहितीही नसेल. परिपक्व होऊन प्रक्रिया करून बनवलेल्या हळदीपेक्षा कच्च्या हळदीमध्ये अधिक प्रमाणात घटक असतात. त्यामुळे आहारात कच्च्या हळदीचा समावेश करायला हरकत नाही. जाणून घ्या कच्च्या हळदीचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे तसेच कोणत्या लोकांनी आहारात कच्च्या हळदीचा वापर टाळावा याविषयी –

रोगप्रतिकारकशक्ती वाढते
कच्च्या हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्च्या हळदीचे सेवन करावे. कच्च्या हळदीचे लोणचे, चटणी, सूप बनवले जाते किंवा दुधात उकळवून सेवन केले जाते. कच्च्या हळदीपासून बनवलेल्या चहामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते
कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डायबेटिज
कच्ची हळद डायबेटीजसाठी गुणकारी आहे. हळदीमध्ये असणारे करक्युमिन डायबेटीजला कंट्रोल करण्यासाठी उपयोगी ठरते. डायबेटिज रुग्णांनी रोज सकाळी कच्ची हळदयुक्त दूध घ्यावे.

सर्दी -खोकला
कच्ची हळद दुधामध्ये टाकून पिल्याने सर्दी -खोकला कमी होतो.

ताप
हळद बुरशीजन्य संक्रमणापासून शरीराचे रक्षण करते आणि शरीराला ताप येण्यापासून वाचवते.

कोरडा खोकला
कच्च्या हळदीचा छोट्याश्या तुकडयाची पेस्ट मधासोबत मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरचे काळे डाग
चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी कच्ची हळद फायदेशीर आहे. कच्ची हळद बारीक वाटून त्यात दूध घालून घट्ट पेस्ट बनवा.ही पेस्ट डागांवर लावा १५-२० मिनीटानंतर चेहरा कोमट पाण्याने धूऊन घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी
हळदीत असणाऱ्या करक्युमिनमुळे फॅट बर्न होते. वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी कच्ची हळदयुक्त दूध घ्यावे.

त्वचा निरोगी आणि चमकदार बनते
कच्ची हळद चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

शरीरावरची सूज कमी करते
शरीरावर सूज आली असल्यास कच्ची हळद, आले आणि तुळशीच्या पानांचा चहा करून प्यावा. त्यामुळे शरीरावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळेल.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते
कच्च्या हळदीची थोडी पेस्ट आणि मेथीचे दाणे मिसळून खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप : ज्या लोकांना हळदीची ऍलर्जी आहे त्यांनी हे उपाय करू नयेत. कच्च्या हळदीचा वापर करण्यापूर्वी चिकित्सकांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. कारण यामुळे रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो तसेच रक्तप्रवाह वाढतो. शस्त्रक्रिया व्हायची असेल तर त्यांनी कच्च्या हळदीचे सेवन करू नये.

ॲक्टिव्ह राहण्यासाठी चहा, कॉफी ऐवजी निवडा ‘हे’ 6 पर्याय, आयुष्यभर होतील अनेक फायदे

मानसिक तणाव दूर करण्यासाठी करा ‘ही’ योगासने