पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, प्रोटिन, फायबर, अँटिऑक्सिडंट आणि पोटॅशिअम यांसारखे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात. जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
पिस्त्यामध्ये असणारे ल्युटेन आणि झेक्झानथिन यांसारखे डोळ्यांचे घटक असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते.
शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते
पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेटस, फॅट, प्रोटिन,फायबर, कॅल्शिअम, झिंक हे घटक शरीराला तात्काळ ऊर्जा देतात. ज्यामुळे शरीर अधिक क्रियाशील राहते. अशक्तपणा जाणवत असलं तर पिस्ता खा.
पोटाचे आरोग्य सुधारते
पिस्त्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. पचनसंस्थेशी संबंधित समस्या असतील तर पिस्ता नियमितपणे खावा.
स्मरणशक्ती वाढते
पिस्त्यामध्ये असणारे कोलीन व व्हिटॅमिन बी स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते
रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी पिस्ता गुणकारी आहे. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी चे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिस्त्याचे सेवनामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढते आणि ते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते.
त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी पिस्ता हे वरदान आहे. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला तरुण तर ठेवतातच शिवाय त्वचेच्या इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात.
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
पिस्त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असते. यामुळे केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते.
टीप : पिस्ता आरोग्यवर्धक असला तरी त्याचे सेवन अधिक करू नये. अधिक प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने शरीरातील मेद वाढून वजन वाढू शकते. दिवसभरातून जास्तीतजास्त एक मूठभर पिस्ता खावा. त्यापेक्षा अधिक प्रमाणात पिस्ता खाऊ नये. पिस्ता पचनास जड असल्याने शक्यतो पिस्त्याचे सेवन रात्री करणे टाळावे.