उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने थकवा आणि आळस जाणवतो. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारात फळांचाही समावेश केला पाहिजे. उन्हाळ्यात अननस खाल्यास शरीरातील उष्णतेचा त्रास कमी होतो तसेच शरीराला त्वरित ऊर्जाही मिळते. जाणून घ्या उन्हाळ्यात अननस खाण्याचे फायदे
डोळे, त्वचेसाठी गुणकारी
अननस या फळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे डोळ्याचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
अननसमध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.
पचनक्रिया सुरळीत राहते
अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होत नाहीत.
शरीराची सूज कमी होते
अननसमधील अँटी -इन्फ्लेमेंट्री गुण शरीराला येणारी सूज कमी करण्यास मदत करते
हाडाच्या आरोग्यासाठी गुणकारी
अननसमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅगनीज हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
अननसमध्ये असणारे पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.