जेवल्यानंतर अनेकदा माऊथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप पदार्थाची चव वाढवण्यासाठीही खाल्ली जाते. आपल्या घरात सहज उपलब्ध होणारी ही बडीशेप आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाऊन घेऊयात बडीशेप खाण्याचे फायदे.

बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह, पोटॅशिअम आणि अन्य खजिन्यांचे प्रमाण भरपूर असते. बडीशेपचे वैज्ञानिक नाव फॉनिक्युल वल्गारे असे आहे. बडीशेप पचनासंबंधित समस्येसह डोळ्यांची दृष्टी, वजन कमी करणे आणि अन्य समस्यांवर गुणकारी ठरते.

बडीशेप खाण्याचे फायदे :
1. वजन कमी करणे :
फायबरचे भरपूर प्रमाण असलेली बडीशेप ना की फक्त वजन नियंत्रणात ठेवते. याशिवाय फॅट कमी करण्यासही मदत करते. कोरियामध्ये एक संशोधनात समोर आले की एक कप बडीशेपयुक्त चहा पिल्यास वजन नियंत्रणात राहते.

2. अस्थमा :
एक संशोधनानुसार बडीशेप ब्रोनिकल मार्ग साफ करून श्वसन क्रिया सुधारते. फुफुसांच्या आरोग्यासाठी बडीशेपचे सेवन लाभदायक ठरते. बडीशेपमध्ये असणारे
पाइथोन्यूट्रिएंट्स अस्थमासाठी फायदेशीर ठरतात.

3. तोंडाचा दुर्गंध :
तोंडाचा दुर्गंध येणे ही अनेकांची समस्या असते. बडीशेप खण्यानेंहि समस्या दूर होते. त्यासाठी काही दिवस रोज जेवणानंतर बडीशेपचे सेवन करावे लागते. बडीशेप खाण्याने तोंडांत लाळेचे प्रमाण वाढून बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.

4. कोलेक्ट्रोल :
बडीशेपमधील फायबरचे भरपूर प्रमाण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. फायबर, कोलेस्ट्रॉलला रक्तात मिसळण्यास रोखण्याचे काम करते. यामुळे व्यक्तीच्या हृदयाच्या समस्याही कमी होतात.

5. पचन :
बडीशेपचे दाणे अपचन कमी करण्यास पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. जेवणानंतर रोज थोडी बडीशेप खाल्यास पचन क्षमता सुधारण्यास मदत होते.