खजूर (Dates) हे मधुर, शीत गुणात्मक, वात-पित्त कमी करणारे गोड पौष्टिक फळ आहे. यात कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटकही असतात. खजुरामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, खनिजे असतात. खजूर खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात आपण पाहूयात –

ऍनिमियावर गुणकारी
ऍनिमिया झालेल्या लोकांनी खजूर अवश्य खावेत. खजुरामध्ये भरपूर आयर्न असते.
खजूराचे सेवन केल्यास थकवा दूर होतो.

कोलेस्ट्रॉल
खजुराचे दररोज सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण घटून कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर उत्तम उपाय आहे.

मानसिक आरोग्य चांगले राहते
दररोज खजूर खाल्ल्याने मेंदूचा विकास होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. शिवाय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते. त्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.

हृदय मजबूत आणि निरोगी बनते
खजूर हृदय मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यातील पोषक घटकांमुळे हृदय मजबूत आणि निरोगी बनते. शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे हृदय विकारासारख्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.

थकवा दूर होतो
खजूरातील पौष्टिक घटक शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी करतात. खजुराच्या रोजच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

बद्धकोष्ठतेपासून आराम
खजूर खाल्ल्याने केवळ बद्धकोष्ठताच नाही तर अपचन, गॅस, ॲसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात. पोटाच्या समस्येवर खजूर अत्यंत गुणकारी औषध मानले जाते.

शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते
खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक ॲसिड असतात. ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते.

मज्जासंस्थेचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते
खजूर मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. नियमित खजूर खाल्ल्याने मज्जासंस्थेचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते.

हाडे मजबूत होतात
खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.