‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रसिद्ध असलेले करवंद हे फळ उन्हाळा ऋतूमध्ये येते. करवंदाच्या औषधी गुणांमुळे वर्षातून एकदाच येणारे हे फळ अवश्य खावे. जाणून घ्या करवंद खाण्याचे फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी उपयुक्त
करवंदामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तवाढीसाठी करवंद उपयुक्त आहे. शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल तर उन्हाळ्यात नियमितपणे करवंद खावीत. तसेच करवंद रक्त शुद्ध करते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

पोटाच्या विकारांवर गुणकारी
करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोटाच्या विकारांवर करवंद गुणकारी आहे. करवंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक
करवंदामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

आम्लपित्त कमी होते
आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत प्यावे.

दात आणि हाडे मजबूत होतात
करवंदामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.

शरीरात थंडावा निर्माण होतो
करवंदामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या देखील कमी होतात.

स्मरणशक्ती वाढते
करवंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते.

वजन कमी होण्यास मदत होते
करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने त्याचे सेवन केल्याने बराच काळ आपल्याला भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.