ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स असतात. ओवा हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला असून त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. तो केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. ओवा अनेक आजारांवर गुणकारी आहे. जाणून घ्या ओवा खाण्याचे फायदे –
सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी
ओवा एक प्रभावी अँटी-कफ एजंट म्हणून काम करते आणि फुफ्फुसातील हवेचा प्रवाह वाढवून खोकल्यापासून त्वरित आराम देते
सर्दी-खोकला झाल्यास कफ कमी होण्यासाठी ओव्याची धुरी घ्या अथवा ओवा तव्यावर गरम करून कापडाच्या पुरचुंडीने त्याचा शेक छातीला द्या. नाक मोकळे होण्यासाठी या पुरचुंडीचा वास घ्या.
पचनक्रिया सुधारते
ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. आम्लपित्त, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या विविध पाचक स्थितींवर उपचार करण्यासाठी ओवा एक प्रभावी उपाय आहे. ओवा खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटत असल्यास आराम मिळतो. ओवा पोट आणि आतड्याच्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरला जातो.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. कारण ओव्याच्या पाण्याने तुमची चयापचय शक्ती वाढते
सांधेदुखीपासून आराम
ओव्यामध्ये वेदनशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधे आणि स्नायू वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
ओव्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मासिक पाळीच्या वेदना कमी करतो
ओवा खाल्ल्याने पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
मायग्रेन
ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने अथवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्यामुळे मायग्रेनच्या त्रास कमी होतो.