उन्हाळात काळ्या आणि हिरव्या द्राक्षांना मोठी मागणी असते. ही रसाळ, गारेगार द्राक्ष खाल्याने भर उन्हाळात शरीराला चांगला थंडावा मिळतो. परंतु, ही दोन्ही द्राक्षे तुमच्या शरीरासाठी किती गुणकारी आणि आरोग्यदायी आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?. ही द्राक्षे तुमच्या शरीरातील प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन यांचे प्रमाण भरपूर वाढवून तुम्हाला भर उन्हाळात आजारापासून दूर ठेवू शकतात. काय आहेत ही द्राक्षे खाण्याचे फायदे? आपण जाणून घेऊयात.
काळी द्राक्ष खाण्याचे फायदे (Black Grapes Benefits) :
1. काळी द्राक्ष डोळ्यांच्या दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर असतात. काळी द्राक्ष खाल्याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारते.
2. काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही भरपूर असते, जे हृदयाला बळकट बनवतात. तसेच मधुमेह रुग्णांसाठीही काळी द्राक्ष गुणकारी ठरतात. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रमाण ठरवून ही द्राक्ष खावीत.
3. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे केसांसाठी आणि त्वचेसाठी लाभकारी असतात. काळी द्राक्ष खाल्याने त्वचाही तजेलदार होते.
4. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच वजन कमी करण्यासाठीही काळी द्राक्ष फायदेशीर ठरतात. याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होतात.
5. काळी द्राक्ष किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे मूत्र मार्गही साफ होतो. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही द्राक्षाचे सेवन करू शकतात.
हिरवी द्राक्ष खाण्याचे फायदे (Green Grapes Benefits) :
1. हिरवी द्राक्ष देखील शरीराला आरोग्यदायी ठरतात. हिरव्या द्राक्षाने हृदय विकाराच्या समस्या कमी होतात.
2. हिरव्या द्राक्षात फायटोकेमिकल असते. तसेच यात फायबर अधिक असल्याने वजन घटवण्यास द्राक्ष फायदेशीर ठरतात.
3. हिरव्या द्राक्षामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात. परंतु ते योग्य प्रमाणात खाले पाहिजे. तसेच हिरव्या द्राक्षाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.