गेले वर्षभर देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु कोरोनाची लागण झालेल्यांनी लस कधी घ्यावी हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर हे वाचा.
* एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकार शक्ती तयार होते. जी 90-180 दिवस टिकते. नैसर्गिक प्रतिकार शक्ती ही व्यक्तीनुसार बदलू शकते. कोरोनातून बरे झालेल्यांनी 2-4 आठवड्यांनी कोरोनाची लस घ्यावी.
* कोरोना लस घेतली म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही याची शाश्वता नाही परंतु लस घेतली आणि तुम्हाला कोरोना झाला तर त्याची लक्षणे फार सौम्य असतील त्यामुळे लस घेणे महत्त्वाचे आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील लसी कोरोनाची लक्षणे, रोगाची तीव्रता आणि रिकव्हर होण्याची वेळ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रभावी आहेत.
*भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेला रोखता येऊ शकत नाही असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा धोकादायक आणि प्राणघातक विषाणू टाळण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे.