डोकेदुखी ही एक अत्यंत सामान्य पण कधी कधी त्रासदायक अशी समस्या आहे.
डोकेदुखीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. ती तात्पुरती असते पण कामावर, मूडवर आणि एकूणच आयुष्यावर परिणाम करू शकते. डोकेदुखीची कारणं वेगवेगळी असू शकतात आणि त्यावर घरगुती उपायांनी आराम मिळू शकतो.
- डोकेदुखीची प्रमुख कारणे (Major Causes of Headache) :
ताणतणाव आणि मानसिक तणाव
झोपेची कमी / अपुरी विश्रांती
पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
मोबाइल / लॅपटॉपच्या स्क्रीनकडे अति वेळ बघणे
अन्न वेळेवर न खाणे किंवा उपाशी राहणे
थंडी किंवा बदलते हवामान
साइनस / मायग्रेन / रक्तदाबाचे त्रास
ॲसिडीटी
उष्णता
शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्याने
ऑक्सिजनची कमतरता
- डोकेदुखीवर घरगुती उपाय (Home Remedies for Headache) :
पुदिन्याचं तेल (Peppermint Oil)
कपाळावर हलक्या हाताने पुदिन्याचं तेल चोळल्याने थंडावा मिळतो आणि तात्काळ आराम होतो.
आल्याचा चहा (Ginger Tea)
आल्यात दाहशामक गुणधर्म असतात. एक कप गरम आल्याचा चहा डोकेदुखी कमी करतो.
आलेयुक्त चहामुळे डोकेदुखी राहतेच शिवाय सर्दीमुळे घसा आणि अंग दुखत असेल तर त्यावरही अराम मिळतो. कारण आलेयुक्त चहा शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत करतो.
चंदन पावडर (Sandalwood Paste)
उष्णता , गरमी किंवा उन्हामुळे जर डोकं दुखत असेल तर चंदन पावडरची पेस्ट तयार करून कपाळावर लावा.
लिंबाचा रस (Lemon Juice)
ॲसिडीटी किंवा गॅसमुळे जर डोके दुखत असलं तर एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तात्काळ आराम मिळेल.
मीठ किंवा खाण्याचा सोडा (Salt or Baking Soda)
शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्याने देखील डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अशावेळी लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्या.
श्वसनाचे व्यायाम ( Breathing Exercises)
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही डोके दुखू शकते. अशावेळी भरपूर झाड असलेल्या ठिकाणी फेरफटका मारावा. तसेच श्वसनाचे व्यायाम देखील करावेत.
हळदीचं दूध (Turmeric Milk)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं गरम दूध प्यायल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि डोकेदुखी कमी होते.
भरपूर पाणी प्या (Stay Hydrated)
डिहायड्रेशनमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी प्यावं.
झोप पूर्ण घ्या (Get Enough Sleep)
कमीत कमी ७–८ तासांची झोप ही मेंदूला विश्रांती देण्यासाठी गरजेची आहे.
योग व ध्यान (Meditation)
ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने, श्वसन प्रक्रिया (प्राणायाम) आणि ध्यान केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
थंड कपड्याचा शेक (Cold Compress)
कपाळावर थंड पाण्याच्या कपड्याने शेक दिल्यास डोकेदुखी कमी होते. विशेषतः मायग्रेनमुळे होणाऱ्या डोकेदुखीत आराम मिळतो.