केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारकडून आता एलपीजी गॅसवर सबसिडी (LPG Subsidy) दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी उज्वला योजना अंतर्गत लाभार्थ्याला मिळणार आहे. यामध्ये 14.2 किलोच्या बारा एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. ही सबसिडी या नव्या आर्थिक वर्षापासून लागू केली जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली.
उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर नियमित खा द्राक्षं, जाणून घ्या द्राक्षं खाण्याचे इतर फायदे
सरकारकडून प्रत्येक सिलेंडरवर 200 रुपयाचे अनुदान मिळाल्याने सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान वर्षभरात मिळते. 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत ज्यांना ही सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात बारा सिलेंडर देण्यात येतात. आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.