चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मेकअप प्रॉडक्ट्स वापरतात. ते सर्वानाच सूट होतात असं नाही. चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक हवी असेल तर, रोज रात्री झोपण्याआधी थोडा वेळ काढून खालील व्यायाम करा. चेहरा आपोआप चकमदार बनेल.
डोळ्यांची मसाज
सर्वात आधी डोळ्यांजवळ असलेल्या चेहऱ्याची मसाज करावी. कारण दिवसभर केलेल्या कामामुळे डोळ्यांवरही ताण येतो. त्यामुळे रात्री झोपताना डोळ्यांजवळील भागाची मसाज करा.
मानेला मसाज करा
मानेवर ताण आला असेल तर मानेचा थोडा व्यायाम करा. मानेला वर-खाली करा. तसेच उजवीकडे न्या नंतर डावीकडे फिरवा. त्यामुळे मानेवरचा ताण कमी होतो. त्यानंतर मानेचा मसाजही करावा. दररोज 30-40 सेकंद मानेची मसाज करा.
चेहऱ्याची मसाज
एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून मसाज करा. नियमित रात्री रोज चेहऱ्याला मसाज कल्याने रक्ताभिसरण वाढून चेहरा चमकदार बनतो.
कडक उन्हात ‘त्वचे’च्या समस्येपासून राहा असे दूर; करा हे उपाय
सत्या नडेला यांच्या मुलाच्या निधनाला ‘हा’ गंभीर आजार ठरला कारणीभूत