औषधी हळद, आले आणि आवळा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. हे तिन्ही गुणकारी पदार्थ एकत्र करून त्याचे सेवन केल्यास आरोग्यदायी काढा तयार होतो. तसेच हे तिन्ही पदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध होतात. आयुर्वेदानुसार या मिश्रणाचे सेवन केल्याने आरोग्याला अगणित फायदे होतात. या मिश्रणाचे कसे सेवन करावे आणि काय आहेत त्याचे फायदे हे आपण पाहणार आहोत.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा :
हळदीसह आवळा आणि आले एकत्र करून रस घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या मिश्रणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. याशिवाय यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते.

खोकला सर्दी घालवा :
आले, हळद, आवळा हे सकाळी एकत्र करून पिल्यास सर्दी आणि खोकल्यापासून दिलासा मिळतो. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आवळ्यामध्ये अनेक आवश्यक घटक आहे. आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

पोटाचे विकार दूर करा :
पोटदुखी, अपचन, मळमळ याबरोबर पोटाच्या अनेक समस्यांवर उपाय करण्यासाठी आले, हळद गुणकारी ठरतात. जर पोटाच्या अनेक समस्या तुम्हाला जाणवत असेल तर अनुषीपोटी हळद आणि आले याचे सेवन केले करावे.

शरीराच्या वेदना दूर करा :
आवळा, हळद, आले हे आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो. याच्या एकतरी मिश्रणात अनेक खजिने असल्याने ते पिल्यास शरीराच्या अनेक वेदना दूर होण्यास आणि शरीराला आराम मिळण्यास मदत होते. असे असले तरी या मिश्रणाचे योग्य प्रमाणातच सेवन करावे.