केस धुण्यासाठी अधिक गरम पाणी वापरणे, केस घट्ट बांधणे, अधिक केमिकलयुक्त शाम्पू वापरल्याने केस चिकट होत असतात. स्काल्पमधून अधिक सीबम स्रवत असेल तर, केस तेलकट बनून चिकट बनतात. केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी खालील घरगुती उपायांचा अवलंब करा.

*चहा पावडर किंवा चहाची पाने पाण्यात उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केसांच्या मुळांवर लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवा.

*केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी केसांना दही लावा नंतर व्यवस्थित केस स्वच्छ करा.

*केसांना कांद्याचा रस लावा. एक तासानंतर केस व्यवस्थित धुवून स्वच्छ करा. यामुळे केस चिकट होणे कमी होतात शिवाय केस मुलायम, चमकदार बनतात. केसांची वाढही होते.

*लिंबाचा रस केसांच्या मुळाशी लावावा. पंधरा मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवावेत.

*एक वाटी दह्यात आवळा पावडर मिक्स करून केसांना लावावी. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.

*मेथीचे दाणे रात्रभर भिजत घालून सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावावी. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.

मुळा खा आणि आजारांना दूर ठेवा

रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी उपाय