बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्या पेस्टने अंडरआर्म्सला ५ ते १० मिनिट मसाज करा, नंतर थंड पाण्याने स्वच्छ करा. यामुळे घामाची दुर्गंधी कमी होईल शिवाय अंडरआर्म्सचा काळपटपणाही कमी होईल.

लिंबू
अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा किंवा अंघोळीच्या आधी लिंबाने आपल्या अंडरआर्म्सला मसाज करा.

खोबरेल तेल
आंघोळ केल्यानंतर अंडरआर्म्सला खोबरेल तेल लावा.

कॉटनचे आणि शुभ्र कपडे वापरावेत
उन्हाळ्यात घाम शोषून घेणारे आणि सैलसर असे कॉटनचे आणि शुभ्र कपडे वापरावेत.

कोरफड
अंघोळीच्या आधी कोरफडीच्या गराने किंवा कोरफड जेलने अंडरआर्म्सला मसाज करा.

टोमॅटो ज्यूस
दिवसभरातून एकदा एक ग्लासभर टोमॅटोचा ज्यूस प्यावा, त्यामुळे घाम जास्त प्रमाणात येत नाही.