उन्हाळयात अनेकांना सनटॅनची समस्या निर्माण होते. उघड्या त्वचेवर टॅनचे पॅचेस येतात. काही घरगुती पॅकच्या मदतीने सनटॅन घालवता येऊ शकते. जाणून घ्या सनटॅन घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत…

दही, हळद आणि कॉफी पॅक
दह्यामध्ये १ चमचा कॉफी आणि हळद मिसळा. आणि हा पॅक टॅन झालेल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

कॉफी आणि मध
कॉफीमध्ये मध मिक्स करून पॅक बनवा. टॅन झालेल्या त्वचेवर लावा. १०-१५ मिनिटांनी धुवून टाका.

 

बटाटा रस, दही, बेसन
बटाटा रस, दही, बेसन एकत्र मिसळून पॅक तयार करा आणि टॅन झालेल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. या पॅकमुळे टॅनिंग कमी होईलच शिवाय त्वचाहही घट्ट होईल.

टीप – सनटॅन लवकर कमी होत नाही. ते हळूहळू कमी होते. त्यासाठी नियमितपणे उपाय करावे लागतात.