पायांची स्वच्छता कशी करावी
पायांना घामाने दुर्गंधी येऊ नये म्हणून नेहमी पायांची स्वच्छता राखा. त्यासाठी खालील उपायांचा अवलंब करा.
1) एक चमचा तुरटी पावडर पाण्यात टाकून त्या पाण्याने पाय धुवावेत.
2) पाण्यात व्हिनेगर घालून पाय धुवावेत.
3) खडे मीठ पाण्यात टाकून विरघळावे. त्या पाण्याने पाय धुवावेत.
4) आल्याचा रस काढून तो तळपायांना चोळावा काही वेळाने कोमट पाण्याने पाय धुवावेत.
5) कोमट पाण्यात मीठ टाकून १५ मिनिट पाय बुडवून ठेवा. यामुळे पायांचे स्नायू मोकळे होतील आणि दुर्गंधीही दूर होतील.
6) कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिसळावा. या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
7) दोन चमचे चहापावडर किंवा दोन-तीन टी बॅग पाण्यात उकळवून त्यात थोडेसे साधे पाणी घालून त्यात पाय बुडवून ठेवा. त्यामुळे पायाची दुर्गंधी दूर होईल.

मोजे, बूट यांची कसे वापरावेत
1) नेहमी घाम शोषणारे नायलॉनचे आणि सूती मोजेवापर रोजच्या रोज मोजे धुवा.
2) बूट आणि मोजे ओले असल्यास त्यांना दुर्गंधी येते. बूट आणि मोजे नेहमी कोरडे घालावेत. गडबडीत बूट आणि मोजे वळवण्यासाठी तुम्ही हेयर ड्रायरचा वापर करू शकता.
3) शूज, चप्पलमध्ये लेव्हेंडर तेल टाकून ठेवल्याने दुर्गंधी कमी होते.

स्मरणशक्ती वाढवायचीये मग नियमित खा अक्रोड; जाणून घ्या इतर फायदे

लसणाचे आरोग्यदायी फायदे