मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक
मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

दही आणि मधाचा फेसपॅक
दही आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावा. १५-२० मिनिटानंतर चेहरा धुवून टाका. या फेसपॅकमुळे त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो.

टोमॅटो आणि दुधाचा फेसपॅक
टोमॅटोच्या पेस्टमध्ये दूध मिक्स करून चेहऱ्याला लावा. १५-२० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

साय आणि हळदीचा फेसपॅक
दुधाच्या सायीमध्ये किंवा दुधामध्ये हळद मिक्स करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.

दही आणि लिंबाचा फेसपॅक
दह्यामध्ये लिंबू मिक्स करून चेहऱ्याला लावावे. दह्यामुळे त्वचा मॉईस्चराईज होऊन मऊ बनते.

बटाट्याचा फेसपॅक
बटाटा बारीक किसून त्याचा रस काढून घ्या. फेसपॅक ब्रशच्या मदतीने हा रस चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. बटाटयाच्या रसामध्ये लिंबू मिक्स करूनही लावले तरी चालेल. ज्याला लिंबाची ऍलर्जी आहे त्याने फक्त बटाट्याचा रस लावावा.

कोरफड आणि लिंबाचा फेसपॅक
एका वाटीत कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा.

पपईचा फेसपॅक
पिकलेल्या पपईची बारीक पेस्ट बनवून चेहऱ्याला लावावी. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवावा.