नारळाचं तेल
रात्री झोपताना केसांना खोबरेल तेल लावून झोपा. सकाळी उठल्यानंतर शॅम्पूने डोकं धुवा.

टी ट्री ऑइल
केसांसाठी जसं नारळ तेल उपयुक्त असतं त्याचप्रमाणेटी टी ट्री ऑइलही फायदेशीर आहे. यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते. खोबरेल तेल घ्या त्यात टी ट्री ऑइलचे 2 थेंब टाका. नंतर ते टाळूला लावा. नक्की फरक जाणवेल.

कोरफड
कोरफड ही केसांसाठी उपयुक्त असते. कोरफडीचा गर काढून टाळूला लावा. तो अर्धा तास तसाच ठेवा. नंतर शॅम्पूने तो धुवून काढा. कोरफडीत अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा
ओल्या केसांना बेकिंग सोडा लावून काही मिनिटे मसाज करा. नंतर शॅम्पू लावून केसं धुवा.

लिंबाचा रस
एका भांड्यात पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस टाका. नंतर ते मिश्रण केसांना लावा. काही वेळाने शॅम्पू लावून ते धुवून काढा. लिंबाचा रस आम्लयुक्त असतो. यामुळे कोंडा दूर होतो.