माझं आरोग्य (Maz Arogya) : अनेक स्त्रिया आणि पुरुष कोंड्याने (Dandruff) त्रस्त असतात. या कोंड्यामुळे केसाची वाढ खुंटणे, खाज सुटणे, डोक्याची त्वचा कोरडी होणे असे त्रास वाढू शकतात. मात्र तज्ज्ञांच्या यासंबंधित काही टीप्स तुमची कोंड्याची समस्या मूळासकट दूर करू शकतात. (Get Rid Of Dandruff Permanently)

तज्ज्ञांच्या मते डोक्यात केसांच्या तळाभोवती मालासेझिया नावाचे यीस्ट तयार होत असते. त्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे शक्यतो केस अस्वच्छ ठेवू नयेत. त्यासाठी योग्य शॅम्पू निवडल्यास आणि आहार नियंत्रित ठेवल्यास ही समस्या दूर होते.

हे ही वाचा –  उन्हाळ्यात तोंड येत आहे? मग ‘हे’ तीन उपाय नक्की करा

शॅम्पू कसा निवडावा? (How To Choose Shampoo)
– शॅम्पू निवडताना केटोकोनाझोल किंवा सेलेनियम सल्फाइड किंवा पिरोक्टोन ओलामाइन असलेले शॅम्पू निवडावा. शॅम्पू खरेदी करताना त्या हे घटक आहे का हे पाहावे. शॅम्पूने केसाची कमीतकमी ५-१० मिनिटे मसाज करून मग पूर्णपणे धुवावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरायला हवा.

आहारात बदल (diat)
यीस्टच्या अतिवृद्धीला साखर, फास्ट फूड या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने प्रोत्साहन मिळते, त्यामुळे केसातील कोंडा वाढतो. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन बी, झिंक, प्रोबायोटिक्स असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास डोक्यातील कोंडा टाळण्यास मदत होते. केळी, अंडी, शेंगदाणे, शेंगा आहारात समाविष्ट केल्याने अधिक फायदा होईल.

हे ही वाचा –  निरोगी आरोग्यासाठी खा विड्याचे पान, झटक्यात दूर होतील ‘हे’ आजार

काय टाळावे?
– केसाला अधिक प्रमाणात तेल लावू नये. जास्त तेल डोक्याच्या त्वचेवरील बुरशीला पोषण देते. त्यामुळे सतत तेल लावणे टाळा.
– एकाच वेळी ड्राय शॅम्पू, हेअर स्प्रे आणि इतर हेअर स्टाइलिंग सगळं वापरण्यापेक्षा एक ठराविक पद्धत निवडा.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)