चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे पील ऑफ मास्क. पील ऑफ मास्क त्वचेला डागरहित,चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. जाणून घेऊयात घरगुती पद्धतीने पील ऑफ मास्क कसे बनवावेत.

एग व्हाइट पील ऑफ मास्क
अंड्याचा पांढरा बल्क व्यवस्थित फेटून घ्या आणि चेहऱ्याला लावा. मास्क सुकल्यानंतर काढून टाका.

जिलेटिन पील ऑफ मास्क
एक चमचा जिलेटीनमध्ये २ चमचे दूध आणि २ थेंब लॅव्हेंडर ऑईल टाका. हे मिश्रण गरम करा थंड झाल्यानंतर चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर काढून टाका.

संत्र्याच्या सालीचा पील ऑफ मास्क
त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी संत्र्याच्या सालीचा पील ऑफ फेस मास्क फायदेशीर आहे. संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर तयार करा. एक वाटी पाण्यात थोडी साखर घालून गरम करा. गॅस बंद करा. त्यानंतर या पाण्यात संत्र्याच्या सालीपासून बनवलेली पावडर टाका. हे मिश्रण थंड करून चेहऱ्याला लावा. मास्क सुकल्यानंतर काढून टाका.

चारकोल, जिलेटीन पील ऑफ मास्क
अर्धा चमचा चारकोल आणि अर्धा चमचा जिलेटिन मिसळा. त्यात 1 चमचा गरम पाणी घालून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर १५-२० मिनिटांनी काढून टाका.

सफरचंदाचा पील ऑफ मास्क
सफरचंदाची साल काढून त्याची बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये दूध आणि मध व्यवस्थित मिसळून घेऊन चेहऱ्याला लावा. २०-२५ मिनिटांनी मास्क काढून टाका.

कच्च्या हळदीचे आरोग्यवर्धक फायदे

वजन कमी करायचंय मग आहारात करा ओट्सचा समावेश; जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे