१ एप्रिलपासून अनेक वस्तू, सेवा, क्षेत्र याविषयीच्या नियमांत व दरात बदल केले जातात. जाणून घ्या २०२३ या वर्षात आर्थिक गोष्टींशी निगडित कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत आणि याचा जनसामान्यांच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार याविषयी माहिती –
आयकर income tax
आजपासून नवीन आयकर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब लागू झाले आहेत. यासोबतच प्राप्तिकरातील मूळ सूट मर्यादाही ५० हजार रुपयांनी वाढली आहे. तसेच आता तुम्हाला ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. आयकर स्लॅबची संख्या ६ वरून ५ करण्यात आली तसेच आता नवीन आयकर व्यवस्था ही डीफॉल्ट झाली आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizens Savings Scheme
नवीन आर्थिक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. एका खात्यासाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये तर, संयुक्त खात्यांसाठी ही मर्यादा ७.५ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये झाली आहे

लहान बचत योजना Small savings plan
लहान बचत योजनेच्या गुंतवणूकदारांना ठेवींवर जास्त व्याज मिळेल. सरकारने ३१ मार्च रोजी एप्रिल-जून २०२३ या तिमाहीला व्याजदरात वाढ केली. लहान बचत योजनांवरील व्याजदर ७० बेस पॉईंटने वाढला आहे.

महिला सन्मान योजना Mahila Samman Yojana
महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत’ योजना सुरू होत आहे. महिला किंवा मुलींच्या नावाने महिला सन्मान बचत योजनेतू तुम्ही गुंतवणूक करू शकता. ही एकवेळ योजना असून २०२३-२०२५ दरम्यान फक्त दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल.

डेट म्युच्युअल फंड Mutual Fund
डेट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल, ज्यामुळे इथे गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा (LTCG) लाभ मिळणार नाही. तसेच, मार्केट लिंक्ड डिबेंचरमध्ये केलेली गुंतवणूक ही अल्प मुदतीची भांडवली मालमत्ता मानली जाईल.

पोस्टाच्या योजना Post Schemes
पोस्टाच्या एका वर्षांच्या मुदत ठेवींवर आता ६.८ टक्के व्याज मिळणार आहे. त्यावर आधी ६.६ टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे ६.९ टक्के, ७ टक्के आणि ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील (एमआयएस) व्याजदरात ०.३० टक्के वाढ करण्यात आली असून, त्यावर ७.४ टक्के दराने व्याजदर लागू होईल.

पीपीएफ PPF
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील (पीपीएफ) गुंतवणुकीवरील ७.१ टक्के आणि बँकेतील बचत खात्यातील शिलकीवर ४ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

ई-गोल्ड पावती E-Gold receipt 
नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर फिजिकल सोन्याचे ई-गोल्ड पावतीमध्ये रूपांतर केल्यावर कोणताही भांडवली कर लाभ मिळणार नाही.

जीवन विम्यावरील कर Tax on life insurance
५ लाखांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम उत्पन्न आता १ एप्रिल २०२३ पासून करपात्र असेल.

शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

घरातील ‘हे’ तीन पदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहेत अत्यंत फायदेशीर