कडुलिंबाची पाने (Neem leaves)
कडुलिंबाची पाने आपल्याला सहज उपलब्ध होतात. अंघोळीच्या आधी कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळून घ्या. नंतर ते पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मिसळा. अशी अंघोळ केल्याने तुम्हाला त्वचेवरील मुरुम आणि खाजेच्या समस्येपासून सुटका मिळेल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

खडे मीठ (Rock salt)
अंग दुखत असेल तर अंघोळ करताना पाण्यात मोठ्या मीठाचे खडे टाका. आंगोळीच्या पाण्यात खडे मीठ टाकल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. तसेच आपल्या स्नायूंना आराम मिळतो. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

लिंबू (Lemon)
अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाका. लिंबाचा रस अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने त्वचा आतून स्वच्छ होते आणि चमकते. तसेच शरीराला घामाचा वास येत नाही. तो दूर होतो. हा उपायही तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता.