जेव्हा शरीरातील वात वाढतो तेव्हा शरीरात जिथे जिथे पोकळी आहे अशा ठिकाणी समस्या निर्माण होतात. सांधे दुखणे, चालण्यास अडथळा होणे, गुडघे कमजोर झाल्यासारखे वाटणे असा त्रास वातामुळे होतो. वात झालेल्यांना आहारात काही पथ्य पाळावी लागतात. जाणून घ्या वाताचा त्रास असणाऱ्यांनी कोणती पथ्य पाळावीत –
शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या गोष्टी वात असणाऱ्यांनी खाऊ नये.
कोरड्या भाजा खाणे टाळावे. कोरड्या भाज्यांमुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाही.
सुके मासे खाणे टाळावे. कोरडा आहार आणि मिठाचे अतिरिक्त प्रमाण यामुळे शरीराला वात होण्याची शक्यता जास्त असते.
मूग, मसूर, तूर, वाटाणे, मटार, पावटे याचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.
आंबवलेले पदार्थ खाण्यामुळेही वाताचा त्रास असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.