आपल्या शरीरासाठी हिमोग्लोबिन आणि लोह हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, कमजोरी, श्वास घेण्यास त्रास यांसारखे लक्षणे दिसतात. लोहाची (Iron) कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढवता येते आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहते. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते उपयुक्त पदार्थ –
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ (Foods that boost Hemoglobin)
तुळशीची पाने (Basil Leaves)
तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता भरून निघते.
बीट (Beetroot)
१०० ग्रॅम बीटामधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळते. बीटमध्ये लोहाबरोबर व्हिटॅमिन सीही मोठ्या प्रमाणात असते.
पालक (Spinach)
पालक ही लोहयुक्त पालेभाजी आहे. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आहारात नियमित समावेश करावा.
टोमॅटो (Tomato)
टोमॅटोमध्ये लोह व व्हिटॅमिन सी असते. नियमित सेवनाने हिमोग्लोबिन वाढते तसेच पचनसंस्था सुधारते.
शेंगदाणे व पीनट बटर (Peanuts & Peanut Butter)
शेंगदाणे अथवा पीनट बटरचे सेवन केल्याने रक्तातील लोहाची पातळी सुधारते.
खजूर (Dates)
खजूरमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि लोहाची कमतरता भरून निघते.
डाळिंब (Pomegranate)
डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर व्हिटॅमिन्स असतात. यामुळे शरीराची झीज भरून निघते.