हिमोग्लोबिन आणि लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर जाणवते. रोजच्या आहारात काही अन्नपदार्थांचा समावेश केला तर रक्तातील लोहाचे प्रमाण वाढून हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते.

हिरव्या पालेभाज्या
प्रत्येक १०० ग्रॅम हिरव्या पालेभाज्यांमध्ये २.७ मिलीग्रॅम लोह असते. पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते.

अंडी
एका अंड्यामध्ये सुमारे ०.६ मिलीग्रॅम लोह असते. लोहाची कमतरता असणाऱ्यांनी आहारात अंड्यांचा समावेश करावा.

मासे
हॅलिबट, सॅल्मन, ट्यूना आणि पर्च या माशांमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते, साधारणपणे, १०० ग्रॅम सॅल्मन माशांमध्ये सुमारे ०.३ मिलीग्रॅम लोह असते. तसेच सॅल्मन माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असते. याचा फायदा मेंदू, डोळे आणि हृदय अशा अवयवांना होतो.

सुकामेवा
नट, सुकामेवा, बिया आणि सुक्या मेव्यामध्ये देखील सर्वाधिक लोह असते. प्रत्येक १०० ग्रॅम ड्रायफ्रुट्समध्ये १ ते २.६ मिलीग्रॅम लोह असते.

कडधान्य व डाळी
आहारात छोले, राजमा, उडीद, लाल मसूर आणि तूर डाळ यांसारख्या पदार्थांचा समावेश केल्याने लोहाचे प्रमाण वाढते.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असते. टोमॅटोच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय पचनसंस्थाही सुधारते.

पीनट बटर
शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेलं पीनट बटरमुळे रक्तातील लोह वाढते.

खजूर
नियमित खजूर खाल्ल्याने रक्तातील लोहाची कमतरता भरून निघते.

डाळिंब
डाळिंबामुळे तुमच्या शरीराची झीज लवकर भरून निघते. डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.