रक्तातील हिमोग्लोबिन ((Hemoglobin) कमी झाले तर थकवा, अशक्तपणा जाणवतो. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो लोह आणि प्रथिने यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित रहावी, याकरता लोहाची आवश्यकता असते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडसाठी हिमोग्लोबिन हे देवाण-घेवाणीचे काम करते.

खजूर
खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते, परिणामी हिमोग्लोबिन वाढते.

दूध
दुधाला सुपरफूड म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

पिस्ता
पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.

गूळ आणि शेंगदाणे
गूळ आणि शेंगदाणे यांच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते.

पालक
पालक लोहाचा खूप मोठा स्त्रोत आहे. 100 ग्रॅम पालकमध्ये जवळपास 0.81 मिली ग्रॅम लोह असते. त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आहे, त्या लोकांनी त्यांच्या आहारात पालकचा समावेश करावा.

सोयाबीन पनीर
सोयाबीन पनीरला’ टोफू म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण असते.

विविध प्रकारीच्या डाळी
विविध प्रकारीच्या डाळी या लोह आणि प्रथिनांचा देखील उत्तम स्त्रोत आहे. एक वाटी डाळीमध्ये जवळपास 6.25 मिली ग्रॅम लोह असते.

संत्री
संत्रीदेखील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह देखील मोठ्या प्रमाणात असते.