*एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.
*सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. अॅनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.
*थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.