अधिक प्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच आजकाल अनेकांना मधुमेहाची (Diabetes)  देखील समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे साखरेच्या सेवन करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रक्तातील साखर(blood sugar) वाढू नये म्हणून योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारही योग्य हवा. जाणून घ्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहावे म्हणून कोणते पदार्थ खावेत –

अक्रोड (Walnut)
अक्रोडमध्ये ओमेगा-३, फायबर, प्रोटीन हे घटक असतात. अक्रोड पचायला खूप वेळ लागतो. याच्या पचनक्रियेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. अक्रोडमुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

ब्रोकोली(Broccoli)
फायबरच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते तर स्टार्च अजिबातही नसते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ब्रोकोली अवश्य खावी.

सॅल्मन मासे( Salmon fish )
सॅल्मन माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. याचा फायदा मेंदू, डोळे आणि हृदय अशा अवयवांना होतो. यामुळे मांसाहार करणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांनी सॅल्मन मासे जरूर खावेत.

पालक (Spinach)
पालकमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पालक अवश्य खावी.

बीन्स (Beans)
वालाच्या शेंगांमध्ये फायबर, कार्ब्स आणि प्रोटीन असते. फायबरमुळे कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचे पचन जलदगतीने होते. रक्तामधील साखर वाढू नये यासाठी कार्ब्स शरीरात विरघळायला फायबरची मदत होते.