आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे डार्क सर्कल्सचे प्रमाण वाढू लागले आहे. कॉस्मेटिक्स वापरून किंवा घरगुती उपायांनी डार्क सर्कल्सची समस्या कमी करता येते. मात्र काही सवयी बदललाय तर डार्क सर्कल्स होत नाहीत. जाणून घ्या डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात –

योग्य वेळेवर आणि पूर्ण झोप घ्या
शरीराला किमान ७ तास झोप हवी असते. मात्र रात्री उशिरा झोपून आणि सकाळी उशिरा उठून ७ तासाची झोप घेतली म्हणजे झोप पूर्ण झाली असे नाही. उशिरा झोपल्याने देखील डार्क सर्कल्सचे प्रमाण वाढते. रात्री योग्य वेळेवरच झोपले पाहिजे.

ग्रीन टीचा वापर करा
ब्लॅक किंवा ग्रीन टी बॅग्ज्स थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. या थंड केलेल्या टी बॅग्स डोळ्यांवर १५ मिनटं ठेवाव्यात.

उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घ्या
घरातून बाहेर पडण्याआधी चेहऱ्याला डोळ्यांच्या खाली सनस्क्रीन लावा. उन्हात फिरताना स्कार्फ आणि गॉगल्स वापरा.

डोळे चोळू नका
डोळे चुरचुरीत असतील, डार्क सर्कल्स झाले असतील तर कधीही डोळे चोळू नका. यामुळे डोळे तर दुखतातच शिवाय डार्क सर्कल्स अधिक दिसतात.

अधिक पाणी प्या
दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पुरेसं पाणी पित रहा. हायड्रेटेड राहिल्यानं डार्क सर्कल कमी होतात तसेच डोळ्यांचे आरोग्यही व्यवस्थित राहते.

आहारात व्हिटॅमिन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा
आहारात व्हिटॅमिन बी-6, बी-12, कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडचा अवश्य समावेश करा. योग्य आहाराने डार्क सर्कल कमी होतात तसेच डोळ्यांचे आरोग्यही व्यवस्थित राहते.