पाणी कधीही उभे राहून न पिता बसून प्यावे आणि पाणी घटा घटा न पिता हळू हळू प्यावे. उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी घातक तसेच आयुर्वेदानुसार चुकीचे आहे. उभे राहून पाणी पिल्याने पोटावर दाब येतो.यामुळे पोटाच्या समस्या, अपचन,ऍसिडिटी, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात.
उभे राहून पाणी पिण्यामुळे पाणी अन्ननलिकेतून वेगाने थेट आतड्यात जाते. ज्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. सतत उभे राहून पाणी पिल्याने सांधेदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो.