*तुमच्या नाकातून जर पाणी येत असेल तर आल्याचा चहा घ्या. आल्याचा चहा प्यायल्याने नाकातून पाणी येणे, नाक बंद होणे या त्रासांपासून आराम मिळतो. आल्याचा चहा घेतल्याने उत्साही वाटते. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

*लिंबू, दालचिनी, आणि मध यांचे चाटण तयार करा. हा एक गुणकारी उपाय आहे. हे घेतल्याने लवकर आराम मिळतो.

*आपण सतत कोमट पाणी प्यायला तर सर्दी, खोकल्याविरूद्ध लढण्यास मदत होते. घशाला आलेली सूज कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे.

*दूधात हळद मिसळून घ्या. हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

*सर्वात साधा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. गरम पाणी घ्या. त्यात हळद आणि मिठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घसा लवकर बरा होतो.

*गाजराचा रस प्या. यामुळेही सर्दी, खोकला लवकर बरा होतो.

*आल्याचे लहान तुकडे करा. त्यावर मीठ टाकून ते खा. यामुळे सर्दी, खोकला आणि घशाचं दुखणं कमी होतं.