तलाठी भरतीसाठी (Talathi recruitment) भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

पद संख्या – ४६४४ जागा
परीक्षा शुल्क – खुला वर्ग १००० रुपये , राखीव वर्ग : ९०० रुपये
अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

महत्वाची माहिती – तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.