अनेकदा टीव्ही, लॅपटॉप, मोबाईलची स्क्रीन सतत पाहिल्याने डोळ्यांवर ताण, थकवा येतो. काही व्यायाम प्रकारांच्या मदतीने ही समस्या दूर करता येते. जाणून घ्या डोळ्यांचा थकवा, ताण दूर करणारे व्यायाम प्रकार –

डोळे झाका
जेव्हा डोळे थकले असतील वा डोळ्यांवर ताण आला असेल तर हा सोप्पा व्यायाम करा.
सुरूवातीला खुर्चीत बसा. नंतर पुढे टेबलावर हाताचे कोपर टेकवा. आता श्वास घ्या, सोडा. मग हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर चोळा आणि ते डोळ्यांवर ठेवा. 4-5 मिनिटे असा व्यायाम करा.

आय रोलिंग
डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर हा व्यायाम करा. डोळ्यांच्या दृष्टीसाठी हा व्यायाम फायदेशीर आहे.
याचे दोन प्रकार आहेत. यात पहिल्यांदा तुम्हाला डोळे गोल फिरवावे लागतात. पहिल्यांदा 10 वेळा डोळे क्लॉकवाईज फिरवा. नंतर 10 वेळा अँटी क्लॉकवाईज डोळे फिरवा.
आता दुसऱ्या प्रकारात भिंतसमोर उभे राहा. भिंतीवर मोठा गोल आहे असं समजा. मग त्या गोलवरून तुमचे डोळे फिरवा. असे केल्याने डोळ्यांच्या स्नायूंना खूप फायदा होतो.

फोकस शिफ्टिंग
ज्यांना चष्मा आहे आणि त्याचा नंबर वाढवायचा नसेल तर त्यांनी हा व्यायाम करावा.
सुरूवातीला खाली बसा. आता डोळ्यांसमोर तुमचा हाताचा अंगठा धरा. त्यानंतर समोर कोणत्याही एका वस्तूवर लक्ष केंद्रित करा. काही वेळाने पुन्हा नजर अंगठ्यावर आणा. हा व्यायाम तुम्ही कितीही वेळा करू शकता.

टक लावून पाहणे
तुम्ही कधी सुर्यास्त होताना पाहिला आहे का? मग आजपासून रोज सुर्यास्त होताना पाहा. किंवा तुम्ही घराबाहेर पडून दूरवर नजर टाकून एकटक पाहा. असे केल्याने डोळ्यांचा व्यायाम होतो. तसेच मनाला शांती लाभते.

त्वचेला सुंदर, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी टिप्स

उन्हाळ्यात बेलफळाचे सरबत पिण्याचे फायदे