शरीराला उर्जा मिळावी म्हणून आपण अन्नपदार्थ खातो. तसेच विविध फळांचं सेवन करतो. ही उर्जा आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी मदत करते. परंतु अन्नपदार्थातून आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. मग काय खावं ते समजत नाही. शरीराला एनर्जी मिळावी म्हणून हे पदार्थ खा.
– केळी
शरीराला झटपट एनर्जी हवी असेल तर केळी खा. केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते. तसेच हे फळ सर्वांना आवडते. शिवाय हे फळ सर्व हंगामात बाजारात उपलब्ध असतं.
– कॉफी
कॉफी प्यायल्याने थकवा तर जातोच शिवाय झोप आणि उर्जेची कमतरता दूर होते. तुम्हाला जेव्हा थकव्याची समस्या जाणवेल तेव्हा कॉफी प्या.
– ब्राऊन राइस
ब्राऊन राइसमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते. त्यामुळे जेव्हा कधी थकवा जाणवतो तेव्हा ब्राऊन राइस खा.
– रताळं
रताळं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच त्याचं सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. शिवाय रताळं हे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढते.
– खजूर
जेव्हा तुम्हाला अशक्तपणा वा थकवा जाणवत असेल तेव्हा खजूर खा. खजूर हा पदार्थ गोड असतो आणि तो सर्वांना आवडतो. खजूरात नैसर्गिक साखर असते जी तुम्हाला त्वरित ऊर्जा देते.