पनीरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र कोणतेही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो. अधिक प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला आणि तोटे होऊ शकतात. जाणून घ्या अती पनीर खाण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम –
वजन वाढू शकते
पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्आस तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारातून पनीर दूर ठेवावे.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते
हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा.
पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. हृदयरोग होऊ शकतो.
उच्च रक्तदाब
पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी पनीर खाऊ नये.
अॅसिडीटीचा त्रास
अॅसिडीटीचा त्रास असणारांनी कमीतकमी पनीर खावे. कारण पनीरच्या अती सेवनाने अॅसिडीटी होऊ शकते.
बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता
कच्चे पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो. पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध पाश्चराइज्ड नसल्यास किंवा पनीर कच्चे खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो, जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
डायरियाची समस्या
पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. परंतु शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास डायरियाची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच एकाच वेळी भरपूर पनीर खाऊ नये.