योगा केल्याने अनेक आजार बरे होतात.योगा रक्तदाबा सारख्या आजारांवरही गुणकारी आहे. चलित ताडासन केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जाणून घ्या आसन करण्याची पद्धत आणि इतर फायदे –
आसन करण्याची पद्धत
दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे जोडत सरळ सावधानच्या स्थितीत उभे राहा. श्वास घेत दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर ताठ करा. नंतर हळूच पंजावर या.
आता शरीराला पूर्णपणे वरच्या दिशेने ताण देत गुडघे न वाकवता ३० सेकंद ते १ मिनिटे चाला. हे आसन २ ते ३ वेळा करू शकता.
आसन करण्याचे फायदे
‘चलित ताडासन’ केल्याने संपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे ताणले जाते.
पायांना बळ मिळते.
मेरुदंड लवचिक होतो.
पाठीच्या कण्याच्या वेदना दूर होतात.
हाडे बळकट होतात.
टीप : हे आसन करताना चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचा रक्तदाब सामान्यापेक्षा कमी असतो, त्यांनी उन्हाळ्यात जास्त मेहनतीची योगासने करू नयेत. अशा योगासनांमुळे उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि कमी रक्तदाबाच्या रुग्णाचा रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.