माझं आरोग्य टीम ः (How to Get Rid of Yellow Teeth) अनेकांना दात पिवळे होण्याची समस्या असते. दररोज ब्रश करूनही अनेकांचे दात पुर्णपणे पांढरे दिसत नाही. हा पिवळेपणा कमी करण्यासाठी काही उपाय आहेत. ते केल्यास नक्कीत फरक जाणवू शकतो. त्यासाठी कोणतेही पदार्थ खाल्यावर चुळ भरणे हा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो, शिवाय सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपताना दिवसांतून दोनदा जरी ब्रश केला तरी दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. परंतु, अनेकदा हे उपाय करूनही दातांचा पिवळेपणा कमी होत नाही. अशा वेळी काही घरगुती सोपे उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल. आता हे उपाय कोणते हे आपण पाहणार आहोत…
दातांचा पिवळेपणा कमी करण्याचे उपाय
1. पांढरे व्हिनेगर – दररोज रात्री आणि सकाळी दातांना पांढरे व्हिनेगर लावल्यास किंवा घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी थोड्या पाण्यात 1 किंवा 2 चमचे पांढरे व्हिनेगर घेऊन ते व्यवस्थित मिसळून त्याने दात घासावे. त्यामुळे दातांचा पिवळसर पणा कमी होण्यास मदत होईल.
2. मीठ – सकाळी आणि रात्री असे दोनदा मिठाने दात घासले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
3. आले – दररोज सकाळी आणि रात्री आल्याच्या रसाने दात घासले तर दातांचा पिवळेपणा कमी होतो.
4. स्ट्रॉबेरी – दररोज सकाळी आणि रात्री दिवसांतून दोनदा स्ट्रॉबेरीने किंवा स्ट्रॉबेरीचा रस आणि मीठ यांचे मिश्रण करून दात घासले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल.
5. बेकिंग सोडा – मीठ आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण वापरून त्याने दात घासले तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, दात घासण्यासाठी फार जास्त प्रमाणात बेकिंग सोडा वापरू नये. त्यामुळे दात झिज होऊ शकते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)