कानात मळ साचला तर तुम्ही काय करता? काहीजण याकडे लक्षच देत नाहीत तर काहीजण कानाच्या पडद्याला इजा होईल म्हणून मळ काढत नाहीत. परंतु यावर काही घरगुती उपाय आहेत ते करून तुम्ही कानातील साचलेली घाण, मळ स्वच्छ करू शकता.
कानात साचलेला मळ काढला नाही तर कानाला खाज येणे तसेच कानात जळजळ होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
कानातील मळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय
– थोडेसे कोमट पाणी करा. मग एक कापसाचा बोळा घ्या. कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने काही थेंब कानात टाका. थोड्या वेळाने एका पायावर उभे राहून ते पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
– सर्वात सोप्पा उपाय म्हणजे तेल गरम करून कानात टाकणे. त्यासाठी ऑलिव्ह ऑइल वा शेंगदाणा तेल वापरू शकता. यापैकी एक तेल घ्या. ते गरम करा. त्यानंतर ते कानात सोडा. यात तुम्ही लसूणही टाकू शकता.
– आणखी एक उपाय म्हणजे कांद्याचा रस. एक कांदा घ्या. तो वाफेवर गरम करा. त्यानंतर कांद्याचा रस कापसाच्या बोळ्याने कानात सोडा. कानातील मळ आपोआप बाहेर पडेल.
– गरम पाणी करून त्यात थोडेसे मीठ टाका. त्याचे काही थेंब कानात टाका. नंतर लगेच ते पाणी बाहेर काढा.
टीप : हे उपाय लहान मुलांवर करू नयेत. तसेच येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.