लसूण हा मसाल्यातील महत्वाचा पदार्थ आहे. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे लसूण अनेक आजारांवर प्रभावी उपाय आहे. सामान्य कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्तीने दिवसातून 4 ग्रॅम म्हणजेच लसणाच्या दोन कळ्या खाणे फायदेशीर ठरते. मात्र गरजेपेक्षा कच्ची लसूण खाणे किंवा लसणाचे अधिक प्रमाणामध्ये सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. जाणून घ्या अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे होणारे साइड इफेक्ट्स –
अतिसार
उपाशीपोटी लसूण खाल्यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते.
लिव्हरला त्रास होऊ शकतो
कच्ची लसूण खाल्यामुळे लिव्हरला त्रास होऊ शकतो. कच्च्या लसणामध्ये अँटी-ऑक्सिडेंट क्षमता जास्त असते. परिणामी लसणाच्या सेवनामुळे लिव्हर आणि पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो.
चक्कर
अधिक प्रमाणामध्ये कच्ची लसूण खाल्यामुळे लो ब्ड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. चक्कर येऊ शकते.
मळमळ, उलटी आणि पोटामध्ये जळजळ
उपाशीपोटी लसणाचे सेवन केल्याने पोटामध्ये जळजळ व्हायला लागते. तसेच मळमळ होऊन उलट्या होण्याचा पण त्रास उद्भवू शकतो.