मध आणि तूप हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक आहेत. तसेच आयुर्वेदातही हे दोन पदार्थ महत्वाचे आहेत. मात्र तूप आणि मध एकत्र खाणे शरीरासाठी हानिकारक असते.जाणून घ्या मध आणि तूप एकत्रित खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात.

डोकेदुखी (Headache)
मध आणि तूप एकत्र घेतल्याने डोकेदुखी, मळमळणे, ऍसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो.

पोटाच्या समस्या (Stomach problems)
मध आणि तूप एकत्रित खाल्ल्याने पोटदुखीसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.

त्वचा विकार (Skin disease)
मध आणि तूप एकत्रित खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

वजन वाढणे (Weight gain)
मध आणि तूप हे दोन्ही पदार्थ पौष्टिक असल्याने मध आणि तूप एकत्र खाल्ल्यास वजन वाढण्याचा देखील धोका असतो.