माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : शिजवलेल्या किंवा कच्च्या अन्नावर वरून मीठ टाकून खाऊ नये असा सल्ला आपले वडीलधारी लोक देतात. हे खरे आहे. जे लोक असे वरून मीठ टाकून पदार्थ खातात त्यांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक ठरू शकते. अनेक जण सॅलड किंवा दह्यावर वरून मीठ टाकून खातात. परंतु अशा पद्धतीने खाणाऱ्यांनी हे टाळले पाहिजे. (Eating curd, salad with salt, be careful)

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

काही लोक सॅलड किंवा दह्यामध्ये मीठ टाकून खातात, या पदार्थांवर मीठ घालकून खाल्यास त्याची चव वाढते. मात्र, तुमच्या आरोग्यासाठी हे हानिकारक ठरू शकते. यामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढवू शकते. यामुळे घाम येणे, उच्च रक्तदाब, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात.

शिवाय अन्नावरून मीठ खाल्ल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण घटते आणि हाडे ठिसूळ होतात. शिवाय पचनक्रियाही मंदावते. वरून मीठ घालून खाल्ल्यास सांधेदुखीही उद्भवते. तसेच झोपेसंबंधित समस्याही निर्माण होतात. दैनंदिन आहारात मिठाचे प्रमाण 2300 मि. ग्रॅ असावे. यापेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हे ही वाचा ः  शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

कोशिंबीर, चाट, किंवा फळांवर तुम्ही काळे मीठ घालू शकता. हे दोन्ही क्षार सोडियम वाढण्यापासून रोखतात. याशिवाय हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, अ‍ॅसिडिटी, गॅसचा त्रास होत नाही.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)