माझं आरोग्य (Maz Arogya) : भारतात सुका मेव्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यात बदाम (Almonds) तर आरोग्यसाठी अतिशय चांगला समजला जातो. बदामात शरीरासाठी अनेक पोषक तत्व असतात. हेच बदाम रोज जेवणापूर्वी खाल्ल्यास तुमची मधुमेहाची (Diabetes) समस्या दूर होऊ शकते. यातील घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे. शिवाय बदाम बुद्धीवर्धकही समजला जातो. (Eating Almonds Could Help Keep Diabetes In control)
बदामामुळे मधुमेह कशाप्रकारे नियंत्रणात राहू शकतो यावर दोन वेगवेगळे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात सहभागी लोक रात्री जेवणापूर्वी 30 मिनिटे आधी मूठभर बदाम (20 ग्रॅम) खात होते. हे संशोधन डॉ. अनूप मिश्रा आणि डॉ. सीमा गुलाटी यांनी आयोजित केले होते.
हे ही वाचा – उन्हाळ्यात तोंड येत आहे? मग ‘हे’ तीन उपाय नक्की करा
या संशोधनात संशोधनकांनी असे गृहित धरले की, जेवणापूर्वी बदाम खाल्लास हे ‘प्रीलोडिंग’चे काम करेल, ज्यामुळे जेवणानंतर ग्लुकोज आणि इन्सुलिनमधील चढउतार कमी होईल आणि हायपरग्लाइसेमियाचे प्रमाणही कमी करेल. या वेळी अभ्यासाचे असे परिणाम दिसून आले की, जेवणापूर्वी बदाम खाल्लाय भारतीयांमध्ये तीन दिवसांत ग्लायसोमिक नियंत्रण वेगाने सुधारू शकते.
बदामासंदर्भातील या दीर्घकालीन संशोधनात कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, फास्टिंग ग्लुकोज, पोस्टप्रॅन्डियल इन्सुलिन, प्रोइन्सुलिनमध्ये घट दिसून आली.
हे ही वाचा – निरोगी आरोग्यासाठी खा विड्याचे पान, झटक्यात दूर होतील ‘हे’ आजार
संशोधनात काय आढळले?
– जेवणाच्या ३० मिनिटे आधी २० ग्रॅम बदाम खाल्ल्याने रक्तातील साखर आणि हार्मोन्समध्ये लक्षणीय घट झाली.
– बदामाचे पौष्टिक घटक चांगले ग्लायसेमिक नियंत्रण ठेवण्यात, भूक कमी करण्यास मदत करतात.
– बदामामुळे पोट रिकामे वाटत नाही.
– वजन नियंत्रणात राहते.
– रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करण्यास मदत होते
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)