कोरोनाने अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. या कोरोना काळात पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात सकस आहार घेण्याची तितकीच गरज आहे. आपल्या आहारात फळे-भाज्या खाण्यावर अधिक भर द्यावा. इम्युनिटी वाढवायची असेल तर आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. ही फळे आणि भाज्या तुमची इम्युनिटी मजबूत करू शकतील.

*पालक-
निरोगी राहण्यासाठी डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्यास सांगतात. पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, गुणकारी असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, सी, ई, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅगनीज, फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर, प्रोटीन आणि फायबर यांसारखी पोषक तत्त्वे असतात. ही पोषक तत्त्वे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. तुम्ही पालकचे सेवन करू शकता.

*ब्रोकली-
ब्रोकली ही अत्यंत स्वादिष्ट भाजी आहे. हा कोबीचाच एक भाग आहे. यात अनेक प्रकारची पोषकतत्त्वे असतात. यात फोलिक अ‍ॅसिड कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम यांचा समावेश आहे. ब्रोकलीचे विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. तुम्ही सलाड, सूप किंवा कढी करून ब्रोकलीचा आहारात समावेश करू शकता. ब्रोकलीतील फायटोकोमिक्लस आणि अ‍ँटीऑक्सिडेंटमुळे विविध व्याधी आणि विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी ताकद येते.

*मशरूम-
मशरुमचे बरेच औषधी गुण आहेत. मशरुम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात अमिनो अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन डी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.

*खोबरेल तेल-
भाजी बनवण्यासाठी विविध प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. तशाच प्रकारे जेवण बनवण्यासाठी खोबरेल तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. या तेलामध्ये मिनरल्स असतात. याची आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी अर्थात आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मोठी मदत होते.